आपण प्रत्येक जण एक वेगवेगळं आयुष्य जगत असताना, काहींनी त्यांच्या आयुष्यात यश मिळवलं असेल, काही त्या यशाच्या अगदी जवळ असेल, तर काही यश मिळवण्यासाठी प्रयत्नांच्या मार्गावरती वाटचाल करत असेल......
भविष्यात आपण सगळेच एक यशस्वी आयुष्य जगत असू, आपल्या आयुष्यात आपण बरच काही मिळवू सुद्धा. त्याचा आनंदही आपल्याला असेल....नक्कीच असणार आहे. पण, मला असं वाटतं की, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात ना एक रिकामी जागा असायला हवी....
एक अशी रिकामी जागा, जी सतत आपल्याला सांगत असते की नाही मला अजून खूप काही मिळवायचं आहे...
आणि अशी रिकामी जागा ही प्रत्येकाच्या आयुष्यात असणं खूप गरजेची आहे....जी सतत आपल्याला काहीतरी नवीन करण्यासाठी प्रेरणा देत असते....जी आपल्याला सांगत असते की मी आत्ता जे मिळवलं हे तर बेस्ट आहेचं पण मी याहून अधिक चांगल काहीतरी आणखी मिळवू शकते.....आणि मला ते मिळवायचं आहे.......
स्वप्नातल्या कळ्यांनो
उमलू नकाच केव्हा
गोडी अपुर्णतेची
लावील वेड जीवा......
Comments