कित्ती कमाल असते ना एखादया व्यक्तीच्या अचानक आयुष्यात येण्याची...एवढ्या मोठ्या जगात आपली भेट ही फक्त काही निवडक लोकांशीचं कशी काय होत असेल??? कधी तुम्हाला पडलाय का हा प्रश्न...आपल्या रोजच्या दिनक्रमात असंख्य माणसं आपल्या डोळ्या समोरून जात असतात, पण आपली भेट मात्र फक्त त्या एका स्पेशल व्यक्ती बरोबर होते. आणि त्यांच्यात नकळत एकमेकांना जोडणारा धागा म्हणजेच “नातं” निर्माण होत...एक असं नातं जे प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळं असतं. काहींच्या आयुष्यात त्या नात्याला नाव नसतं, तर काहींच्या आयुष्यात त्या नात्याला नाव असून देखील ते शब्दात व्यक्त करणं त्यांच्यासाठी कठीण असतं ...
ही अशी नाती खरचं कित्ती खोलवर रुजलेली असते आपल्या मनात...
जणू मनाच्या एका कप्प्यात त्यांची जागा ही राखिवचं होती....
Comments