“बाप होणं सोप्प नसतं”.....
दुःखाच्या पावसात भिजून
आनंदाची हिरवळ पसरवणारा
बाप असतो....
स्वतःच्या स्वप्नांची होळी करून
इतरांच्या आयुष्यात रंग भरणारा
बाप असतो....
अनवाणी पायाने काटेरी वाट तुडवून
उन्हात भाजलेल्या मातीवर
स्वतःच्या घामाने ओलावा पसरवणारा
बाप असतो.....
डोंगराएवढया मनात,
आभाळा एवढं दुःख लपवणारा
बाप असतो...
मुलीच्या कन्यादानाच्या वेळी
अश्रूंचा सागर त्याच्या डोळी
तरी देखील दिल्या घरी सुखी राहा
असा म्हणणारा,
तो बाप असतो...
Comments