कधी कधी स्वार्थी होणं खूप चांगलं असतं...
आपण जे काही काम करतो ना, त्याबद्दल जर आपल्याला कुणी appreciate करत नसेल तर, it's ok 😊.....
तुमच्या कामामधून तुम्हाला आनंद मिळतोय ना, ते महत्वाचं.
आपण जे काही करतो ना ते आपण आपल्या आनंदासाठी केलं पाहिजे.
लोक काय म्हणतील या विचाराने कधीही तुमच्या आयुष्यातला, तुमच्या वाट्याचा आनंद अनुभवायला स्वतःला थांबऊ नका...
आपण आपल्या लहानपणी जेव्हा चालायला शिकत असतो, तेव्हा सुरवातीला आपण पडतो, धडपडतो. लहानपणीच काय अगदी मोठे झाल्यानंतर सुद्धा आपण धडपडतच असतो....
जेव्हा आपल्याला खरचटतं, काही लागतं, जखमा होतात, तेव्हा आपल्या वेदना बघून आपल्या आईला दुःख होतं... ती आपल्या जखमांवरती औषध लावते, आपल्या दुःखात सहभागी होते. पण, तुमच्या कधी एक गोष्ट लक्षात आली का ?????
आपल्या आईला आपल्या वेदना बघून कितीही दुःख वाटतं असलं ना तरी ती त्या वेदना तिच्या स्वतःच्या शरीरावरती नाही घेऊ शकतं.... आपलं दुःख, आपल्या वेदना या आपल्यालाच सहन कराव्या लागतात. त्या वेदना सहन करतांना आपल्याला काय वाटतं, हे जसं आपल्याला माहिती असतं अगदी तसच आपल्या आयुष्यातल्या आनंदाचही आहे. आपल्याला एखाद्या छोट्याश्या गोष्टीचा किती आनंद होतो, हे फक्त आपल्यालाच माहिती असतं...... म्हणून स्वतःच्या आनंदासाठी का असेना पण “थोडे स्वार्थी व्हा....!”
लोक तुमच्यावरती हसतील, हसू द्या.....पण, तुम्ही मात्र तुमचं काम सातत्याने करत रहा...
आपण एखाद्याच्या हसण्याच कारण होतोय ही गोष्ट कित्ती आनंद देणारी आहे. म्हणतात की हसल्यान आयुष्य वाढतं..मग जर का आपण एखाद्याला कळतं नकळतपणे हसवत असू, त्याचं आयुष्य वाढवत असू तर विचार करा आपण कित्ती छान काम करतोय...
आपण जर प्रत्येक गोष्टीकडे positive way ने बघितलं ना, तर प्रत्येकचं गोष्ट ही आपल्याला प्रेरणा देणारी असते....
आपल्या आयुष्यात इतरांना तर आपल्या प्रेरणा स्थानी ठेवा, पण स्वतःचं स्वतःची प्रेरणा व्हायला विसरू नका...जेव्हा आपण स्वतः पासनचं प्रेरणा घेतो ना, तेव्हा आपलं आयुष्य आपल्याला आणखी हवंहवसं वाटायला लागतं.....
आयुष्य खरचं खूप सुंदर आहे....
So, make it memorable for good reasons......
Comments